भोसरीतील भाजप आमदारांने दहा वर्षात विकास कामे करण्याऐवजी प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला आहे. भोसरी मतदारसंघात सामान्य नागरिकांवर गुंडगिरी, दडपशाही, दादागिरी केली आहे. प्रत्येक ठिकाणच्या मोक्याची जागा दिसली, त्यांनी ताबा मारला अशी स्थिती मतदारसंघात आहे. आमदारांनी जागेसाठी ताबा गॅंग, भ्रष्टाचारासाठी मलिदा गॅंग आणि ठेके मिळवण्यासाठी रिंग गॅंग तयार केलेल्या आहेत.
त्यामुळे दहा वर्षात विकास कामे नव्हे उच्चांकी भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे. त्यामुळे भोसरीतील मतदारांनी, सामान्य जनतेने, नोकरदारांनी, शेतक-यांनी आता ठरवलं आहे. शहराचे वैभव परत आणण्यासाठी परिवर्तन करुन भाजप आमदाराला घरी बसवण्याची तयारी केली आहे. अशी घणाघाती टीका आमदार रोहीत पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार रोहीत पवार म्हणाले की, भोसरी मतदारसंघात भाजप आमदाराने गेल्या दहा वर्षात चेंबर पासून बिल्डींग पर्यंत प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांना आमदाराचा भ्रष्टाचार माहीत आहे. त्यांनी केवळ दहा वर्षात भ्रष्टाचार व गुंडगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यासारखं दुसरे काहीच नाही. त्यामुळे मतदारांनी परिवर्तन करायचे ठरवले आहे.
भोसरीचे वैभव परत आणण्यासाठी मतदारांनी भाजप आमदाराला घरी बसविणार आहेत. इथला एमआयडीत अनेक प्रश्न जैसे थे आहेत. शहरातल्या काही कंपन्या गुजरातला नेल्या जात आहेत. त्या कंपन्या थांबवण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवणे आश्यक आहेत.आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात येत आहेत. आमच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या व्यवसाय बंद करण्यासाठी मालकावर दबाब टाकण्यात येत आहेत. पोलीस-प्रशासनाकडून सत्ताधा-याना मदत केली जात आहे. त्यामुळे हे २० तारखे पर्यंत सहन करायचे आहे. आमचे सरकार आल्यानंतर प्रत्येक अधिका-यांना तक्रारीनूसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
माफियाराजमुळे भोसरीची प्रतिमा मलिन
भोसरी मतदारसंघात सामान्य जनता भयभीत आहे. इथल्या भाजप आमदाराने लोकांना प्रचंड त्रास दिलेला आहे. प्रत्येक मोक्याच्या जागेवर ताबा मारलेला आहे. अनेक भोसरीत मलिदा गॅंग, रिंग गॅंग, ताबा गॅंग अशा वेगवेगळ्या गॅंग कार्यरत आहेत. जेवढा जास्त गुंडागर्दी करतील. त्यामुळे त्याचा फायदा अजित गव्हाणे यांनाच होईल. निवडणुकीनंतर आम्हाला ही गुंडागर्दी उपटून फेकून द्यावी लागेल. गुंडागर्दी, दडपशाही, दादागिरी सामान्य जनतेवर केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल. असेही आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्यात भ्रष्टाचार
मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यात पण इथल्या आमदारांनी भ्रष्टाचार केला आहे. हा पुतळा ब्रांझ मध्ये बनविला असल्याचे जनतेला सांगितले आहे. परंतू, जर पुतळा ब्रांझ असते तर पुतळ्याला तडे गेले नसते. त्यामुळे ब्रांझ सांगून लोखंड वापरल्याचा आरोपही रोहीत पवार यांनी केला. या भागात तत्कालिन भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यावर चुकीचे वक्तव्य केले आहे. स्वता आमदारांनी त्यांचे कार्यालयाची जागेवर देखील ताबा मारलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत दादागिरी गुंडागर्दी करुन लोकांना धमकावण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे त्याचा पराभव निश्चित आहे.
धमक्यामुळे आमदार पराभवाच्या छायेत
भोसरीच्या भाजप आमदाराला पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर सभेतून धमक्याची भाषा वापरू लागले आहेत, इथल्या वारकऱ्यांवर हल्ला झाला त्यावेळी धारकरी म्हणून तुमच्यात हिंमत होती का? शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. त्यावेळी तुमच्या भ्रष्टाचारी नेत्यांना सवाल करायची हिंमत नव्हती का. तुमच्या धमक्यांना इथून पुढे कोणी घाबरणार नाही. कारण, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे धमक्या देऊ नका आम्ही गोट्या खेळायला राजकारणात आलो नाही. असाही इशारा रोहीत पवार यांनी दिला आहे.
जकात नाक्यावरुन ताबा मारण्यापर्यंत प्रवास
इथल्या भाजप आमदारांनी शहराची वाटणी केली. महापालिकेतून भ्रष्टाचार करुन करोडो रुपयाची माया जमविली. महापालिका दोन नेत्यांनी वाटून घेतलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लुटलं आहे. त्यामुळे त्यांना पैशाचा माज आहे. मात्र, जनता हूशार आहे. भोसरीतच नव्हे पिंपरी, चिंचवडमध्ये तुतारीच निवडून येईल. भाजपचा अहंकार लोकच मोडतात.
ते लोकसभेला पाहिलं आहे आपण, भोसरीच्या आमदार हे जकात नाक्यावरुन आता ताब्यावर आले आहेत. लंडनच्या हॉटेल बाबत जरा डिटेल्स काढण्याचे काम सुरु आहे. भोसरी मतदारसंघात आलेला करोडोचा निधी गेला कुठे? हे शोधायला हवे. त्यांचे सगळे नगरसेवकही नाराज आहेत. काहीजण हिंमत दाखवून पुढे आले आहेत. काहींना भीतीने शांत आहेत. निवडणुकीनंतर ते पण आपल्यासोबत आहेत. असा दावा रोहीत पवार यांनी यावेळी केला आहे.
भाजपचे देवेंद्र फडणवीस फेक माणूस आहे. ते फेक नरेटिव्ह पसरविण्यात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रातून संविधान कसे बाहेर जाईल. यासाठी ते प्रयन्त करत आहेत. अन ते संविधानवर बोलत आहेत. गुजरातच्या निवडणुकीत समृद्धी महामार्गाच्या खाल्लेल्या पैशाचा पूर आला आहे. त्यामुळे राज्यातील जनता हूशार आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या किमान १७० - १८० च्या आसपास मविआचे आमदार निवडून येतील. असेही रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.