Pimpri Chinchwad : नव्या परवाना धारकांना सुरक्षितेचे धडे

पिंपरी, मोशी येथे ट्रॅफिक पार्कमध्ये पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या नवीन परवानाधाारक उमेदवारांना रस्ता सुरक्षा बाबत माहिती देवून, माहितीपत्रक वाटण्यात आले. तसेच त्यांना रस्ता सुरक्षा शपथ देऊन वाहनांच्या नियमांचे पालन करण्यास सूचित करण्यात आले.

नव्या परवाना धारकांना सुरक्षितेचे धडे

प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले मार्गदर्शन

पिंपरी, मोशी येथे ट्रॅफिक पार्कमध्ये पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आलेल्या नवीन परवानाधाारक उमेदवारांना रस्ता सुरक्षा बाबत माहिती देवून, माहितीपत्रक वाटण्यात आले. तसेच त्यांना रस्ता सुरक्षा शपथ देऊन वाहनांच्या नियमांचे पालन करण्यास सूचित करण्यात आले. या वेळी प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकारी अतुल आदे यांनी नवीन वाहन हाती घेण्यात आलेल्या तरुणांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या. (Pimpri Chinchwad) 

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आरटीओच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन सुुरु आहेत. त्यात अधिकारी अतुल आदे यांनी ट्रफिक पार्क येथे भेट दिली. तरुणांशी संवाद साधून वाहतूक नियम आणि रस्ताा सुरक्षा विषयक नियमांबाबत मार्गदर्शन केले. सीएफआरए मैदानात नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात  65 वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. वाहन चालवत असताना, आपली दृष्टि चांगली असणे आवश्यक असल्याचे या वेळी आदे यांनी सांगितले.  सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, मोटार वाहन निरीक्षक मयूर भोसेकर,  प्रकाश मुळे, बालाजी धनवे, सहा.मोटार वाहन निरीक्षक धनराज नाईकवाडे, सुजित दंडेल,रोहनसिंग गिरासे उपस्थित होते. तसेच रस्ता सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे, सहा. मोटार वाहन निरीक्षक गणेश भांगे व  किरण चोधरी यांनी रस्ता सुरक्षेबाबत उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केेले.  वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वेग मर्यादेचे पालन करावे, सीट बेल्ट तसेच, दुचाकीवर हेल्मेट परिधान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.  
   
राजगुरु नगर एसटी आगारात भेट
चालक दिन आणि रास्ता सुरक्षा अभियअतंर्गत एसटीच्या  राजगुरूनगर आगारात आरटीओ अधिकायांनी भेट दिली. चालकांना सुरक्षित वाहन चालवण्यासाठी व विनापघात सेवा करण्यासाठी प्रबोधन केले.वाहन निरीक्षक प्रवीण आव्हाड, तानाजी धुमाळ साहेब, प्रदीप भाट, अमृत गोडसे यांनी वाहक व चालकांशी संवाद साधला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story