संग्रहित छायाचित्र
मुळशी-ताम्हिणी परिसरातील अडव्हेंचर जंक्शन या गिर्यारोहक संस्थेकडून नवनिर्वाचित आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर यांना तैलबैला सुळका सर करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
ताम्हिणी घाटातील तैल बैला सुळका प्रस्तरारोहणासाठी सुप्रसिद्ध आहे. तैलबैलाचा परिसर खूप दुर्गम असून, वाट घनदाट जंगलातून जाते. कडाक्याची थंडी आणि वाहणारा वारा यामुळे मोहिम आव्हानात्मक होती. मोहिमप्रमुख कृष्णा मरगळे आणि सहकाऱ्यांचा गिर्यारोहकांनातील अनुभव यामुळे ही मोहीम यशस्वी झाली.
सुळक्याच्या पुढील बाजूने चढाई करतांना प्रथम अनंताने लीड क्लायम्बिंग सुरू केलं. शंकर मरगळे यांनी अनंताचा बिले घेत त्याला वर चढवले. नंतर शंकरने निलेशला टॉप बिले रोप तयार करून दिला. कृष्णाने रूट व्यवस्थित सेट करत तिसऱ्या स्टेशनवर मजल मारली. चौघेही तिसऱ्या स्टेशनवर पोहोचल्यावर अनंता ने लीड क्लायम्बिंग करायचा प्रयत्न केला, पण शरीर थकल्यामुळे त्याला ते शक्य झालं नाही. त्यानंतर कृष्णाने पुढच्या चढाईची जबाबदारी घेतली, आणि शंकरने त्याला खालून बिले दिला.
संध्याकाळी चार वाजता अखेर चौघेही सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले. मोहिम यशस्वी झाली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.सुळका सर केल्यावर ताम्हिणी येथील गिर्यारोहक अनंत कोकरे यांनी ड्रोनच्या साहाय्याने सुळक्यावरील चित्रीकरण केले.
आमदार शंकरभाऊ मांडेकर हे बहुमताने निवडून आल्याबद्दल त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्या देण्यासाठी ही मोहिम डॉ,मानसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.