संग्रहित छायाचित्र
आकुर्डी येथील सेंट जोसेफ चर्चच्या वतीने ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजच्या वेशभूषेत चर्चच्या सदस्यांकडून नागरिकांना चॉकलेट व केकचे वाटप करण्यात आले. फादर सिंटो चालीसेरी आणि समन्वयक के. एम. रॉय यांच्या पुढाकाराने सांताक्लॉजच्या वेशभूषेत चर्चच्या सदस्यांनी काढलेल्या या फेरीची सुरुवात आकुर्डी चर्चपासून करण्यात झाली.
मुंबई-पुणे महामार्ग काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, चापेकर चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, भेळ चौक, निगडी बस स्थानक, भक्ती शक्ती, साने चौक, थरमॅक्स चौक, एश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी या मार्गे आल्यानंतर चर्चमध्ये फेरीची सांगता झाली. यावेळी चर्चचे के. एम. रॉय, एम. जे. बाबू, रॉय मॅथ्यू यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.