कंटेनरखाली चिरडून एकाचा मृत्यू

पार्किंगमध्ये कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनरने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना सोमवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास भांबोली येथे घडली. दुर्गेश फुलचंद यादव (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) असे चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 26 Dec 2024
  • 01:32 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महाळुंगे: पार्किंगमध्ये कंटेनर रिव्हर्स घेत असताना कंटेनरने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना सोमवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास भांबोली येथे घडली. दुर्गेश फुलचंद यादव (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) असे चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी संतोषकुमार शिवजी चौबे (वय ४१, रा. बिहार) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोविंद लालता प्रसाद (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंद हा कंटेनर चालक आहे. तो त्याच्या ताब्यातील कंटेनर सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भांबोली येथील स्वामी पार्किंग मध्ये पार्क करत होता. कंटेनर रिव्हर्स घेत असताना त्याच्या चाकाखाली दुर्गेश यादव हे अडकले. कंटेनर खाली चिरडून दुर्गेश यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story