गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष : बापूसाहेब भेगडे

विद्यमान आमदारांचे गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने आंदर मावळमधील समस्या वाढतच चालल्या आहेत. आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांना मोठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण बांधील असणार आहोत

Bapusaheb Bhegade

गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष : बापूसाहेब भेगडे

आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांसाठी मोठी रोजगारनिर्मिती करणार

विद्यमान आमदारांचे गेल्या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने आंदर मावळमधील समस्या वाढतच चालल्या आहेत. आंदर मावळमध्ये पर्यटन व्यवसाय वाढवून तरुणांना मोठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण बांधील असणार आहोत, असे आश्वासन बापूसाहेब भेगडे यांनी तरुणांना दिले. सर्वपक्षीय व जनतेचे अपक्ष उमेदवार अण्णा उर्फ बापूसाहेब भेगडे यांना पवन मावळ, नाणे मावळनंतर आंदर मावळातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

बापूसाहेब भेगडे यांनी आज शनिवारी आंदर मावळातील पिंपरी, माळेगाव बुद्रुक, कुणेवाडी, कुणे, अनसुटे (मानकुली) पारिठेवाडी, इंगळून, किवळे, कशाळ, भोयरे, कोंडीवडे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, आंबळे, कदमवाडी, शेटेवाडी, शिरे, मंगरूळ, गोळेवाडी आदी गावांना भेट देत प्रचारदौरा केला. यावेळी महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावला. तसेच गावोगावी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत, तसेच फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात बापूसाहेब भेगडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, शिवाजी आसवले, गणेश कल्हाटकर, शिवाजीराव पवार, अतिश परदेशी, बाबाजी गायकवाड, रोहिदास आसवले आदींसह ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी-माजी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रचार भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आपण समस्या सोडविण्यास बांधील असल्याचे आश्वासन देत बापूसाहेब भेगडे म्हणाले, की विद्यमान आमदार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले ? पाच वर्षात शेतीला पाणी पुरवता आला नाही. जवळ धरण असतानाही शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. आपण प्रथम शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करू.

शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत आजपर्यंत  पोहोचल्या नाहीत की मुद्दाम पोहोचवल्या नाहीत ? हा प्रश्नच आहे. आपण माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळेच आपण मावळची संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असून, मावळला समृद्ध बनवणे हे आपले ध्येय आहे, असेही भेगडे म्हणाले.

दत्तात्रय पडवळ म्हणाले, की मुलांना घाटाखाली नेऊन व्यसनी बनवणाऱ्याला साथ न देता मुलांच्या हातात पुस्तक देऊन त्यांना रोजगार देणाऱ्या बापूसाहेब भेगडे यांच्या पाठशी ठामपणे उभे राहा. वारकरी संप्रदायाचे कामही बापूसाहेब भेगडे यांच्याइतके कुणी केले नाही. पण याचा त्यांनी कधी गवगवा केला नाही.

आमदार शेळके यांनी धनगर बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी रुपेश म्हाळसकर म्हणाले, धनगरांची काठी डोक्यात कधी पडेल, सांगता येत नाही. तेव्हा कळेल धनगर बांधव नेमका काय असतो. जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचा आपल्याला खेद वाटतो. बापूसाहेब भेगडे समतेचा विचार घेऊन निवडणूक लढवत असून, जनता नक्कीच पाठीशी राहील, असा विश्वास वाटतो. 

मी २०१९ ला एक वेगळा प्रयोग केला. पण तो प्रयोग फसला. गावकी भावकीचा विचार न करता झोकून देऊन सुनील शेळके यांचे काम केले होते. मात्र, 'एकदाच आमदार करा ' हा शब्द त्यांनी न पाळता मोठा विश्वासघात केला. ही माझी मोठी चूक होती. तशी चूक तुम्ही यावेळी आमदार शेळके यांच्याबद्दल करू नका. मावळातील सर्वच पक्ष हे मतप्रवाह विसरून माझ्यामागे ठामपणे उभे राहिले आहेत. त्यामुळेच पैशाची गुर्मी व सत्तेची मस्ती जिरवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. -बापूसाहेब भेगडे, सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story