ख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार - डॉ. सुलक्षणा शिलवंत

ख्रिस्ती समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे यासाठी आपण भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी ख्रिस्ती बांधवांशी बोलताना व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 9 Nov 2024
  • 12:00 pm

ख्रिस्ती समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे यासाठी आपण भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी ख्रिस्ती बांधवांशी बोलताना व्यक्त केले.

डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात ख्रिस्ती समाजाचे खूप मोठे योगदान आहे. परंतु त्यांना आजवर ज्या सन्मानाने सहकार्य करण्याची गरज होती ती केली गेली नाही. आपण मात्र या संदर्भात या समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच समाजातील तरुणांना युवकांना तसेच युवतींना स्वबळावर उभे करण्यासाठी मदर तेरेसा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत.

यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, या समाजाला त्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे व यासाठी भविष्यात आपण योग्य ते सहकार्य करणार आहोत.

यावेळी रीजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ लुकास केदारी म्हणाले की, ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांची आजवर कोणी दखल घेतली नव्हती डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पहिल्यांदा या प्रश्नांबाबत सहकार्याचे स्वतःहून आश्वासन दिले आहे. आपल्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्णय मतदार संघातील तमाम ख्रिस्ती बांधवांनी घेतला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील तमाम ख्रिस्ती बांधव निश्चितपणे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील. यावेळी रिजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे सचिव ॲड. अंतोन कदम, सल्लागार पीटर डिसूझा आणि सुधीर हिवाळे यांच्यासह अनेक ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest