अण्णा बनसोडे यांचा प्रवास प्रेरणादायी : अजित पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या बद्दल गौरव उद्गार काढत ,बनसोडे यांचा पानटपरी चालक, नगरसेवक ते आमदार हा राजकीय प्रवास प्रेरणादायी असल्याचं म्हटल आहे.
बनसोडे हे निस्वार्थ भावनेने नागरिकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडाडीने झटणारा कार्यकर्ता असल्याचंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
कोरोना महामारी सारख्या संकटात बनसोडे यांनी राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय जाहीर होण्याआधीच पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना कोरोणा प्रतिरोधक लसी मिळाव्यात म्हणून बनसोडे यांनी आपल्या निधितून 25 लाख रुपये देऊ केल्याची आठवणीला देखील अजित पवार यांनी उजाळा दिला . तर अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक विकास कामे केल्याचं ही यावेळी अजित पवार म्हणाले.
दरम्यान, बनसोडे यांच्या काही नकारात्मक बाबी असू शकतात. तशा त्या प्रत्येकांच्या असतात. मात्र नकारात्मक बाबी आहेत, म्हणून एका चांगल्या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्यातल्याच एक सहकारी पुढे जातोय हे लक्षात घेतलं पाहिजे; आणि निर्विवाद अण्णा बनसोडे यांना मदत केली पाहिजे असं अहवान देखील अजित पवार यांनी महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलं.
मी कृतज्ञ
अजित पवारांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल काढलेले गौरवोद्गार म्हणजे पक्षाने आणि पिंपरी चिंचवड मधील मतदार नागरिकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. मी या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही. अण्णा बनसोडे, आमदार
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.