मावळ : अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून मावळात ३६ लाखाची रोकड जप्त

मावळ विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून ३६ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (१० नोव्हेंबर) ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त केली आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Sun, 10 Nov 2024
  • 09:13 pm
Bharari team, Ajit Pawar,Maval assembly constituency,Talegaon Dabhade,Police Station,36 lakh cash

मावळ विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून ३६ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून रविवारी (१० नोव्हेंबर) ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त केली आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे.

सचिन शाबू मुर्‍हे (रा. सोमाटणे, चौराईनगर) असे रोकड जप्त केलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. तर सचिन मुऱ्हे यांची पत्नी धनश्री सचिन मुऱ्हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या त्या सदस्या आहेत.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. मुर्‍हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुर्‍हे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव पोलीस आणि भरारी पथकामार्फत मुर्‍हे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत कार्यालयात ३६ लाख ९० हजार ५०० रूपयांची रोकड आढळून आली.

मुर्‍हे यांना रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली. याबाबत निवडणूक विभाग आणि आयकर विभागाला कळविण्यात आले आहे. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती उपयुक्त गायकवाड यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story