अध्यक्ष हुकूमशाप्रमाणे वागतात ; वक्फप्रकरणी जेपीसीमधून माघार घेण्याचा विरोधकांचा इशारा

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संसदीय समितीचे अध्यक्ष भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्यावर विरोधकांनी हुकूमशाहीचा आरोप केला आहे. या खासदारांनी समितीपासून वेगळे होण्याचा इशारा दिला आहे.पाल हे विरोधकांचे मत न घेता एकतर्फी निर्णय घेत आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांना विधेयकावर आपले म्हणणे मांडण्याची योग्य संधी मिळत नाही, असा त्यांचा आरोप आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 6 Nov 2024
  • 02:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावरील संसदीय समितीचे अध्यक्ष भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्यावर विरोधकांनी हुकूमशाहीचा आरोप केला आहे. या खासदारांनी समितीपासून वेगळे होण्याचा इशारा दिला आहे.पाल हे विरोधकांचे मत न घेता एकतर्फी निर्णय घेत आहेत, त्यामुळे विरोधी पक्षाच्या खासदारांना विधेयकावर आपले म्हणणे मांडण्याची योग्य संधी मिळत नाही, असा त्यांचा आरोप आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाचे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करणार आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी बिर्ला यांना संयुक्त पत्र लिहिले आहे, ज्यावर द्रमुकचे ए राजा, काँग्रेसचे मोहम्मद जावेद आणि इम्रान मसूद, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, आपचे संजय सिंह आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बैठकीत एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप. या पत्रात विरोधी पक्षाच्या खासदारांनी तक्रार केली आहे की, जगदंबिका पाल कधी कधी सलग ३ दिवस बैठकांच्या तारखा निश्चित करतात आणि साक्षीदारांना एकतर्फी बोलावण्याचा निर्णय घेत आहेत. पूर्वतयारीशिवाय योग्य चर्चा करणे आम्हाला शक्य नसल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. त्याचवेळी विरोधी सदस्य समितीच्या कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप भाजप खासदारांनी केला आहे.

जेपीसीचे लोकसभेत २१ सदस्य आहेत - ७ भाजपचे, ३ काँग्रेसचे.

१. जगदंबिका पाल (भाजप) २. निशिकांत दुबे (भाजप) ३. तेजस्वी सूर्या (भाजप) ४. अपराजिता सारंगी (भाजप) ५. संजय जैस्वाल (भाजप) ६. दिलीप सैकिया (भाजप) ७. अभिजीत गंगोपाध्याय (८) श्रीमती एलएस देवरायालू (टीडीपी) ९. अरविंत सावंत (शिवसेना, शरद पवार) १०. नरेश गणपत म्हस्के (शिवसेना) ११. अरुण भारती (एलजेपी) -आर) १२. असदुद्दीन ओवेसी (एआयएमआयएम)

जेपीसीमध्ये राज्यसभेतील १० सदस्य - भाजपचे ४, काँग्रेसचा एक खासदार

१. ब्रिजलाल (भाजप) २. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी (भाजप) ३. गुलाम अली (भाजप) ४. डॉ. राधा मोहन दास अग्रवाल (भाजप) ५. सय्यद नसीर हुसेन (काँग्रेस) ६. मोहम्मद नदीम उल हक ( टीएमसी) ७. व्ही विजयसाई रेड्डी (वायएसआरसीपी) ९. एम मोहम्मद अब्दुल्ला (डीएमके) १०. संजय सिंह (आप) ११. डॉ. धर्मस्थळ वीरेंद्र हेगडे (राष्ट्रपतींनी नामनिर्देशित)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest