धक्कादायक ! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) घडली. गार्गी रणपारा असे या मुलीचे नाव आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

धावत धावत शाळेत पोहोचली; दम लागला म्हणून बसली, बसताक्षणी पडली मृत्युमुखी

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १०)  घडली. गार्गी रणपारा असे या मुलीचे नाव आहे. गार्गी ही शाळेचा जिना चढली आणि दम लागला आणि ती जमिनीवर कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

गार्गी ही गुजरातच्या थलतेज भागात असलेल्या झेबर स्कूल फॉर चिल्ड्रन या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. दरम्यान, गार्गी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी शाळेत पोहोचली. परंतु, शाळेचा जिना चढल्यानंतर तिला दम लागला म्हणून ती बाकड्यावर बसली आणि काही वेळातच ती जमिनीवर कोसळली. तिला अशा अवस्थेत पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले शिक्षक आणि इतर विद्यार्थी घाबरले. त्यांनी ताबडतोब तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शाळा व्यवस्थापनाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही व्हीडीओमध्ये दिसत आहे की, गार्गी रणपारा लॉबीमध्ये चालत आपल्या वर्गाकडे जाताना आहे. पण वाटेत अस्वस्थतेमुळे ती लॉबीतील एका खुर्चीवर बसते. त्यानंतर तेथील शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली.

दोन दिवसातील ही दुसरी घटना
शाळकरी मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. कर्नाटकात मंगळवारी (दि. ७) एका आठ वर्षांच्या मुलीचा शाळेत पडून मृत्यू झाला. तेजस्विनी वर्गमित्रांसोबत असताना अचानक शाळेच्या कॉरिडॉरमध्ये कोसळली. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी तेजस्विनीला तातडीने जेएसएस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Share this story

Latest