संग्रहित छायाचित्र
राज्यातील शिक्षकांना नव्या वर्षात पगाराची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. दरमहिन्याला होणार शिक्षकांचा पगार उशीरा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेमुळं राज्य सरकारच्या तिजोरीवर अर्थिक भार आल्याचे समजत आहे.
सत्ता स्थापनेच्या कालावधीदरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता. शपथविधी सोहळ्यानंतर लाडक्या बहिणींना डिंसेबरचा हप्ता महिन्याचा अखेरी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, महिलांच्या खात्यात टप्याटप्याने जमा होत आहे. पण दुसरीकडे, शिक्षकांच्या पगारासाठीची तरतूद रखडली गेली. यामुळं शिक्षकांचा पगार 1-2 दिवस उशीरा होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांचा पगार दरमहिन्याला 1 ते 5 या तारखांदरम्यान होत असतो. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांमधील शिक्षकांचे पगार या कालावधीदरम्यान होत असत. मात्र, त्यासाठी ज्या काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्याची पुर्तता ही 15 तारखेपर्यंत होणं आवश्यक असते. त्यानंतर शिक्षकांचा पगार होत असतो. योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारासंदर्भातील तरतूद काल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं नविन वर्षात शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस लांबणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम चार ते पाच दिवसात 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिला आणि आधार सीडींग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.