संग्रहित छायाचित्र
अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकरच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना उडवले असून एकाचा मृत्यू झाला झाला आहे. तर दूसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मुंबईमधील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली.
मुंबईमधील समतानगर पोलिसांत या प्रकरणात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून तर अभिनेता आदिनाथ कोठारेची पत्नी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात उर्मिला कोठारे आणि तिच्या कारचा चालक हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातात उर्मिलाच्या कारचा चक्काचूर झाला असून एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने तिचा जीव वाचल्याचं सांगण्यात येत आहे. शूटिंग संपवून उर्मिला घरी परतत होती त्यावेळी हा अपघात झाला. यावेळी वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला काम करत असलेल्या मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना उडवले.
या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कारचालकाच्या विरोधात मुंबईमधील समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.