संग्रहित छायाचित्र
पुनावळे : अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पत्नी व तिच्या प्रियकराने मारण्याची धमकी दिली. त्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी पुनावळे येथे घडली.
संजित गोविंदराव शिंदे (वय ३७, रा. मायका क्लासिक सोसायटी, पुनावळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ प्रताप गोविंदराव शिंदे (वय ४५, रा. श्रीनगर, लातूर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी मयत संजित यांची पत्नी आणि तिचा प्रियकर रोहित थोरात (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रताप शिंदे यांचा भाऊ (मयत) संजित शिंदे याची पत्नी आणि आरोपी रोहित थोरात यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमसंबध मयत संजित शिंदे याला माहीत झाले. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून संजित शिंदे व त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देऊन त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून संजित यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.