Lalit Patil Drug Case : ड्रगमाफिया ललित पाटील यांच्यासह 14 जणांवर मोक्का

ड्रगचे रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलसह त्याच्या 14 साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Archana More
  • Fri, 3 Nov 2023
  • 09:44 am

Lalit Patil

पुणे :  ड्रगचे रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलसह त्याच्या 14 साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. ससून रुग्णालयासमोर दोन कोटी रुपयांचे ड्रग सापडल्यावर  ड्रगचे रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पलायन केले होते. 

ससून रुग्णालय प्रशासन, राजकारणी आणि पुणे पोलिसही ललित पाटील प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या पार्श्वभूमीवर ललित पाटील, अरविंद लोहरे, अमित शहा उर्फ उर्फ अमित मंडल, रोफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, गोलू

सुलतान अन्सारी, प्रज्ञा कांबळे, झीशन शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित, समाधान कांबळे, इम्रान शेख,आणि हरिश्चंद्र  पंत या 14 जनावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 ससून रुग्णालयाच्या गेट जवळून 30 सप्टेंबर रोजी दोन कोटी 14 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे सर्व रॅकेट्स रुग्णालयातून ललित पाटील चालवत होता. त्याला भूषण पाटील, बलकवडे, लोहरे तसेच इतर आरोपी मदत करत होते. 

अंमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने मोठ्या प्रमाणावर सोने विकत घेतले होते.  आणखी 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest