Pune Crime : 'आयटी'यन तरूणाकडून सीनियरवर चाकू हल्ला

आयटीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने महिलेसोबत गैरकृत्य केल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Wed, 1 Nov 2023
  • 09:36 pm

'आयटी'यन तरूणाकडून सीनियरवर चाकू हल्ला

पुणे : आयटीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाने महिलेसोबत गैरकृत्य केल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.  या रागातून 'सेल्स एक्झिक्युटीव्ह'वर चाकूने वार करून हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता जंगली महाराज रस्त्यावरील कर्णिक प्लाझा इमारतीमध्ये असलेल्या आयटी प्रीनियर या इंस्टिट्यूटमध्ये घडली.

ऋषिकेश अशोक नाडे (रा. डेक्कन कॉर्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संकल्प योगेश जांदे (वय २३, रा. आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी रोड, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी संकल्प हे आयटी प्रीनियर या  इंस्टिट्यूटमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. या कंपनीमध्ये नाडे हा प्रशिक्षणार्थी म्हणून आलेला होता. तेथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला आयटी प्रीनियर मधून चार-पाच ठिकाणी प्लेसमेंट देण्यात आली. मात्र, तो सिलेक्ट झाला नाही. त्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये येऊन वाद घालण्यास सुरुवात केली. याच कालावधीमध्ये त्यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच, संकल्प यांनी ई-मेल पाठवीत त्याची तक्रार केली होती. त्याचा राग मनात धरून नाडे याने संकल्प यांना 'मला कोर्स मधून का काढले? मला कोर्समध्ये परत घे.  नाहीतर तुला खलास करतो' असं म्हणत त्याच्या हातातील चाकून पोटात वार केला. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest