Pune Crime News : कलवड वस्तीत फोडल्या २० कार, त्रिकूटाचा धुमाकूळ

लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका तरुणाने धुमाकूळ घालत तब्बल १५ ते २० मोटारी फोडल्या. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून लोहगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 6 Nov 2023
  • 10:23 pm
Pune Crime News : कलवड वस्तीत फोडल्या २० कार, त्रिकूटाचा धुमाकूळ

संग्रहित छायाचित्र

दोन अल्पवयीन मुलांसह तिघे ताब्यात

पुणे : लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका तरुणाने धुमाकूळ घालत तब्बल १५ ते २० मोटारी फोडल्या. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून लोहगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमाननगर पोलिसांचे नियंत्रण राहिले नसून गुन्हेगारांवरील 'कंट्रोल' सुटल्याचे चित्र दिसत आहे.

हसीम खालील शेख (वय १८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी इनायतअली शौकतअली अन्सारी (वय २७, रा. कलवडवस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.  हसीम आणि त्याच्या साथीदारांनी सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान कलवड वस्तीमध्ये धिंगाणा सुरू केला. लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि हत्यारे घेऊन दिसेल त्या वाहनांवर प्रहार करायला सुरुवात केली.

याठिकाणी असलेल्या मशीदीजवळ उभ्या असलेल्या मोटारीदेखील या तिघांनी फोडल्या. तोडफोडीचा आवाज ऐकून नागरिक जागे झाले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघाजणांना ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक रविवार वारंगुळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest