पुणे : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुकीत बदल; सायंकाळी पाचनंतर 'हे' रस्ते बंद

पुण्याच्या जगप्रसिद्ध गणेशोत्सवातील आरास, भव्यदिव्य सजावट, संगीत, रोषणाई प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून या काळात मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे रस्त्यांवर अलोट गर्दी आणि कोंडी होते. यंदा ७ ते १७ सप्टेंबर या उत्सवकाळात पुण्यातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

Ganesh festival traffic changes Pune

पुणे : गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुकीत बदल; सायंकाळी पाचनंतर 'हे' रस्ते बंद

वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवणार

पुण्याच्या जगप्रसिद्ध गणेशोत्सवातील आरास, भव्यदिव्य सजावट, संगीत, रोषणाई प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यासह देशभरातून या काळात मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे रस्त्यांवर अलोट गर्दी आणि कोंडी होते. यंदा ७ ते १७ सप्टेंबर या उत्सवकाळात पुण्यातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी ठराविक रस्ते संध्याकाळी पाच तास बंद ठेवण्यात येणार आहेत. पोलिसांच्या वाहतूक शाखेने या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्याचे नियोजन केले आहे. (Ganesh festival traffic changes Pune)

या काळात विद्यार्थी, कामगार आणि भाविकांची गैरसोय कमी करण्यासाठी 'पीएमपीएमएल'कडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील.

'पीएमपीएमएल'च्या मुख्य परिवहन व्यवस्थापकांनी (ऑपरेशन्स) सांगितले की, गणेशोत्सवादरम्यान संध्याकाळी पाचनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर पाचनंतरच्या बसचे मार्ग खाली नमूद केल्याप्रमाणे बदलले जातील. वाहतूक पोलीस विभागाने या अनुषंगाने केलेल्या बदलानुसार बस मार्गात बदल केले जातील. तसा तपशील प्रवाशांना कळवण्याची व्यवस्था केली जाईल.

गणेशोत्सवादरम्यान, मार्ग क्रमांक २, २ ए, २ बी, ११,  ११ ए, ११ सी, २१६, २९८, ३५४, मेट्रो १३, २१, ३७, ३८, ८८, २९७, २८, ३०, आणि १० या मार्गावरील बस शिवाजी रस्त्याने जाणार नाहीत. त्याऐवजी त्या जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन, संभाजी पूल आणि टिळक रस्तामार्गे स्वारगेट चौकात पोहोचतील. टिळक रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या बस शास्त्री रस्त्यामार्गे दांडेकर पूल आणि त्यानंतर मित्र मंडळ चौकमार्गे लक्ष्मी नारायण चौकाकडे जातील. स्वारगेट ते शिवाजीनगर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत कोणताही बदल होणार नाही. मार्ग ३ आणि ६ संध्याकाळच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहतील.

रस्ता बंद काळात मार्ग क्रमांक ५५ ची बस शनिपार/मंडई ऐवजी नटराज स्थानकावरून सुटतील आणि त्यांच्या नेहमीच्या मार्गाने आंबिलओढा कॉलनी आणि सेनादत्त पोलीस चौकी मार्गे सुरू राहतील. ५८ आणि ५९ या मार्गावरील खासगी वाहने आणि बस डेक्कन जिमखाना स्थानकाकडे वळवण्यात येतील.

कोथरूड ते पुणे रेल्वेस्थानकादरम्यान धावणाऱ्या बसमार्ग ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४ सी, १४४ ए, आणि २८३ साठी, कोथरूड ते पुणे स्थानकात कोणतेही बदल होणार नाहीत, परंतु पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या बस ससून रुग्णालय, मालधक्का, जुना बाजार आणि पुणे महापालिका  येथे थांबतील. महापालिका भवन बसस्थानकातून सुटणाऱ्या बस काँग्रेस भवन, बालगंधर्व, डेक्कन बसस्थानक आणि खंडूजी बाबा चौक मार्गे नियमित मार्गाने जातील. वाहतूक पोलिसांनी लक्ष्मी रस्ता वाहनांसाठी बंद केल्यावर हा मार्ग वळवला जाईल.

कोंढवा गेटकडून पुणे स्टेशनकडे येणाऱ्या मार्ग क्रमांक १७४ वरील बस केळकर रोड आणि अप्पा बळवंत चौकाकडे वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या लाल महालाकडे जाणाऱ्या नेहमीच्या मार्गाने देवजी बाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून, हमजेखान चौकातून गुरुद्वारा रस्त्याला हमजेखान चौकातून डावीकडे वळून जातील. लक्ष्मी रस्ता बंद असल्यास पुणे स्टेशन ते एनडीएमार्गे कोंढवा गेटमार्गे १७४ मार्गावरील बस मॉडर्न बेकरी चौकाकडे जातील. नंतर स्वारगेटला जाण्यासाठी सेव्हन लव्हज चौकातून डावीकडे वळतील. स्वारगेटहून ते सारसबाग, टिळक रोड आणि डेक्कन कॉर्नर मार्गे नेहरू स्टेडियमकडे जातील आणि नंतर त्यांच्या नेहमीच्या मार्गाने पुढे जातील.

७, १९७, आणि २०२ या मार्गावरील बस म्हात्रे पूल येथून डावीकडे वळून सेव्हन लव्हज चौक मार्गे मार्गेश्वरगेट शंकरशेठ रोडवर जातील. ते त्यांच्या नेहमीच्या मार्गाने रामोशी गेट, भवानीमाता मंदिर आणि महात्मा गांधी बस स्थानकापर्यंत सुरू राहतील. भवानीमाता मंदिराजवळ बंद झाल्यानंतर ते गोळीबार मैदान ते महात्मा गांधी बसस्थानकादरम्यानचा त्यांचा नियमित मार्ग पुन्हा सुरू करतील.

शास्त्री रस्ता बंद असताना १२, ४२ आणि २९९ या मार्गावरील बस दांडेकर पूल ते सेनादत्त पोलीस चौकी, म्हात्रे पूल आणि त्यानंतर कर्वे रस्तामार्गे डेक्कनकडे आणि पुढे जाण्यासाठी वळवण्यात येणार आहेत. ५, २४. २४ ए, २३५ आणि २३६ या मार्गांवरील बस नेहमीच्या मार्गानेच धावतील

१८०, १८१ क्रमांकाच्या बस मंगला टॉकीज ते सूर्या हॉस्पिटल, कुंभारवाडा, जुनाबाजार, बोल्हाई चौक, लाल देऊळ, वेस्ट एंड, जुना पूलगेट, महात्मा गांधी स्टँड अशा मार्गावरून जातील. टिळक रस्ता बंद झाल्यानंतर ४, २६, ६८, ७१, ३३९, २३२, १०३, ८९, ९०, ६४, ७२, ७८ आणि १९९ या मार्गांवरील बस शास्त्री रस्ता आणि दांडेकर पूलमार्गे आपली सेवा सुरू ठेवतील. मार्ग ११३  आणि ११३ ए दोन्ही शिफ्टमध्ये पुणे महापालिका पेट्रोल पंपावरून कार्यरत राहतील. शिवाजी रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि नटराज बसस्थानकावरून १७ आणि ५० या मार्गावरील बस सुरू राहतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest