संग्रहित छायाचित्र
विविध ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी नुकतेच पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. मतदारांमध्ये भाग घेण्याबाबत तसेच, कवितेच्या माध्यमातून त्यांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी मजुरांकडून मतदान करण्याबाबत शपथ घेतली. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती तसेच पिंपरी चिंचवडच्या ह विभागातील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
नागरी समस्या जाणुन घेणारे अभ्यासू उमेदवार निवडून देण्यात यावेत, नागरी समस्या विधानसभेत मांडल्या जातील यासाठी जनजागृती मध्ये नागरिकांना आवाहन केले. मतदान सर्वश्रेष्ठ काम. घ्या मातृभुमीची आण ,करा मतदान.आपलं मत, विकासाला मत, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा विविध प्रकारच्या घोषणेद्धारे संवाद साधला. कवि आत्माराम हारे यानी कविता सादर करून मतदान करण्याचे आवाहन केले.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विविध मजूर अड्डे आहेत. या ठिकाणी सकाळी विविध भागातील अनेक मजूर कामासाठी एकत्र येतात. त्यांचे विविध प्रश्न आहेत. संघटनेच्या वतीने या मजुरांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांना लोकशाही बाबत माहिती देऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. याबाबत अनेक मजुरांनी देखील मतदान आवर्जून करण्यात असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित नागरिकांना ह प्रभाग समुह संघटक वैशाली लगाडे यांनी मतदान करण्याची शपथ मजुरांना दिली. संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, संगिता जोगदंड, आरोग्य निरीक्षक उद्धव ढवरी, वैशाली लगाडे, शंकर नाणेकर, कवयित्री जयश्री गुमास्ते, कवी आत्माराम हारे, लक्षण जोगदंड, आरोग्य मुकादम, विनोद कांबळे , मुरलीधर दळवी, सचिव गजानन धाराशिवकर , स्नेहल सोनवणे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सचिव ईश्वरलाल चौधरी उपस्थित होते.