विधानसभा निवडणूकीसाठी उद्योगनगरी झाली सज्ज; पिंपरीत १५ उमेदवारांसाठी ३९८ मतदान केंद्र

पिंपरी विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ३९८ मतदान केंद्र असणार आहेत. त्या आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुर्ण करण्यात आली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 11 Nov 2024
  • 03:28 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ३९८ मतदान केंद्र असणार आहेत. त्या आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुर्ण करण्यात आली. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघात निवडणुक रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्राच्या सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निरिक्षक मनवेशसिंग सिध्दू, यांनी देखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

निगडी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन येथे द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक निरिक्षक मनवेशसिंग सिध्दू, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, समन्वय अधिकारी- मुकूंद पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – जयराज देशमुख, नोडल अधिकारी तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी प्रशांत शिंपी उपस्थित होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली.  ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट आणि ११९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.  तसेच  मतदान यंत्रांचे जुळवणी व ‍सिम्बॉल लोडींग दि.१० व ११ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. १३ व १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ईव्हीएम मतदानासाठी तयार करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story