संग्रहित छायाचित्र
भरधाव वेगातील टेम्पोने सहा वाहनांना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात बहिण भाऊ हे दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. ७) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मोशीतील भारतमाता चौकात घडली.
विलास नारायण जंजाळ (वय ५८, रा. एच पी चौक, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. संदिप बाजीराव चव्हाण (वय ३१, रा. मु. पो. कडदे, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप चव्हाण हे आपल्या कारमधून गुरूवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास येत होते. ते मोशीतील भारतमाता चौकात आले असता त्यांच्या कारला पाठीमागून आलेल्या (एमएच १२ एसएक्स ९२७५) या टेम्पोने जोरदार धडक दिली.
या अपघातानंतर टेम्पाचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. त्यानंतर आरोपीच्या टेम्पाने भारतमाता चौक, मोशी येथे थांबलेल्या पाच वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार परेश छगन पाटील (वय २१) यांच्या हाता पायाला मार लागला. तसेच त्यांची बहिण (वय १९), यांच्या डोक्याला, खुब्याला दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तसेच क्रटा गाडीतील महिला व रेहान मराठे हे देखील गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर आरोपी वाहन जागेवरच सोडून पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.