अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डीतील पदयात्रेस जेष्ठ नागरिकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 10 Nov 2024
  • 07:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डीतील पदयात्रेस जेष्ठ नागरिकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वैशाली काळभोर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, भाजपा शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, ईश्वर ठोंबरे, निलेश पांढरकर, प्रमोद कुटे, कैलास कुटे, सविता वायकर व तेजस्विनी दुर्गे, मनीष काळभोर, सतीश काळभोर, कामगार नेते रवी घोडेकर, आबा गायकवाड, रेखा कडाली, मनीषा शिंदे, नाना पिसाळ, खेमराज काळे, अजय शितोळे, सतीश लांडगे, आकुर्डी जेष्ठ नागरिक संघाचे आबा गायकवाड, महेश काटे, मंगेश कुटे, सचिन काळभोर, सचिन बंदी, संतोष तरटे, वसंत काळभोर, मनीषा शिंदे, चैतन्य काळभोर आदींचं आकुर्डी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकारी युवक युती व महिला भगिनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. विठ्ठल मंदिर येथे पदयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले व युवक युवतीने पुष्पवृष्टी करून आमदार अण्ण बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत जेष्ठ यांच्या समस्या आमदारांना बनसोडे यांनी समजून घेतल्या. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story