संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात विखुरलेल्या समस्त सिरवी समाजाच्या सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सिरवी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतानाच सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितले.
नेहरूनगर येथे माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि.10) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिरवी समाजाच्या वतीने महाविकास आघाडी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, विरोधी पक्ष नेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, सिरवी समाजाचे अध्यक्ष वाघाराम केशवजी चौधरी, उपाध्यक्ष बाबुलाव पन्नाजी चौधरी, सचिव गणेशराम लाधाजी चौधरी, रमेश रामजी चौधरी, युवा सचिव मोहनलाल धोघारामजी चौधरी, महिलाध्यक्ष संतोष भेराराम चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी अजित गव्हाणे यांनी सिरवी समाजाचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. अजित गव्हाणे म्हणाले नेहरूनगर भागामध्ये सिरवी समाजाचे काम चांगले आहे. या भागात हा समाज गुण्यागोविंदाने, शांततेने नांदत आहे. व्यवसायाच्या निमित्ताने हा समाज शहरभर विखुरलेला आहे. छोटे मोठे व्यवसाय करणारा हा समाज शहराच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. गेल्या काही वर्षापासून हा समाज आपल्या शहरात मिसळून गेला आहे. आगामी काळात या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार दिला जाईल असे देखील अजित गव्हाणे यावेळी म्हणाले.
अजित गव्हाणे संधीचे सोने करतील - भोसले
अजित गव्हाणे यांचे वडील कै.दामोदर गव्हाणे यांच्याशी माझा जवळून परिचय होता. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी समाजकारण ,राजकारण अतिशय नीतिमत्तेने केले. त्यांच्याच आदर्शावर पाऊल ठेवत अजित गव्हाणे गेल्या 25 वर्षापासून राजकारणात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्तम नेता लाभणार आहे. त्यांना संधी द्या, मी विश्वास देतो अजित गव्हाणे संधीचे सोने करतील असे माजी महापौर हनुमंत भोसले म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.