सांगवीकरांचा निर्धार, यंदा 'तुतारी'च वाजवणार; राहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

वाकड, ता. १० : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारा्र्थ लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता. १०) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 10 Nov 2024
  • 07:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

सांगवीकरांचा निर्धार, यंदा 'तुतारी'च वाजवणार; राहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

वाकड, ता. १० : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारा्र्थ लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता. १०) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती. यावेळी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी परिसरातील युवकांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 

चिंचवड विधानसभेला यंदा नवीन चेहरा निवडून देऊन बदल घडवणार अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. आजच्या रॅली दरम्यान यंदा वारं फिरलंय, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जयघोषाने सांगवी, रहाटणी परिसर दणाणून गेलेला. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप, मराठवाडा विकास संघांचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक वसंत काटे, शिवाजी पाडुळे, गणेश काटे, संदेश नवले, अनिता तुतारे, सागर परदेशी, जालिंदर साठे, अरुण काटे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे, मंगला भोकरे, पिंटू निंबाळकर, बाळासाहेब सोनवने, विजय साने, मोहन बारटक्के, यशवंत कांबळे, मिलिंद फडतरे, विरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

नागरिकांनी रस्त्याच्या दूतर्फा गर्दी करत 'रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी' या घोषणेस हात उंचावून  प्रतिसाद मिळाल्याने रॅलीत उत्साह संचारला होता. रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅली वैशिष्ट्ये:

डॉ.अमोल कोल्हे स्टार प्रचारक सहभागी

युवकांचा लक्षणीय सहभाग 

सांगवी ते रहाटणी : चार तास रॅली 

नागरिकांनी, महिलांनी केले स्वागत

साई चौकात जेसीबीतून पुष्पवृष्टी 

पिंपळे गुरव येथे दोन ठिकाणी जेसीबीतुन महाकाय हार 

सांगवीच्या साई मंदिरात साई बाबा दर्शनाने रॅलीची सुरुवात 

जुनी सांगवीतील अहिल्या देवींच्या पुतळ्याला पुष्पहार 

श्री गजानन महाराज मठात भेट

ग्रामदैवत वेताळ महाराजांचे दर्शन 

नवी सांगवीतील फेमस चौकात म्हसोबा, महालक्ष्मी देवी दर्शन

पिंपळे गुरवमधील भैरवनाथाचे दर्शन

सांगवीकर घराणेशाहीला आणि आश्वासनाला कंटाळले आहेत, त्यामुळे यंदा परिवर्तन घडविण्याचा त्यांचा निश्चय आहे. सांगवीत यंदा तुतारीच वाजणार याबद्दल विश्वास आहे.
- नवनाथ जगताप, माजी अध्यक्ष स्थायी समिती 

ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. मी ठिकठिकाणी लोकांना भेटतो आहे. बदल हवा अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे मला विजयाचा विश्वास आहे.
- राहुल कलाटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story