संग्रहित छायाचित्र
आळंदी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत टोळीला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. शनिवारी (दि.९) आदर्शनगर दिघी येथे ही कारवाई करण्यात आली असून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा (वय २२ रा.आदर्शनगर, दिघी) सोहेल अलिशेर मिर्झा (वय २२ रा. विश्रांतवाडी) रोमन दस्तगीर मुल्ला (वय २० रा. चौधरी पार्क, मंगलमुर्ती रेसीडेन्सी जवळ, दिघी), आकाश सुधीर साळवी (वय २२ रा.गायकवाडनगर, दिघी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्याचे साथीदार बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (रा. दिघी), चेतन ऊर्फ चेप्या पांचाळ (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील हवालदार प्रदीप पोटे व किरण जाधव यांना माहिती मिळाली कि, शिवकॉलनीच्या रस्त्यावर आदर्शनगर, दिघी येथे टोळके दरोड्याच्या तयारीत आहेत. तसेच त्यांच्याकडे घातक हत्यारे आहेत. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लोखंडी कोयते, लोखंडी पालघन, एक लायटर पिस्टल, नायलॉन दोरी, मिर्ची पावडर पुडा, सहा मोबाईल, दोन दुचाकी व एक स्कु ड्रायव्हर असा एकुण २ लाख ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
अधिक तपासात ते आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे समोर आहे. आरोपींवर दरोडा, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजविणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, घरफोडी, अंमली पदार्थ विक्री करणे व वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे आहेत. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, किरण काटकर, मंगेश जाधव, सुनिल कानगुडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.