संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांच्या सोयीसाठी १ ते १३ मे या कालावधीत ‘नो यूवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदारांना मतदानाच्या अनुषंगाने मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. या सुविधेचा शहरातील अधिकाधिक मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या कक्षासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आहे. सुचेता पानसरे यांची ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण, अमर पंडित ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड, अण्णा बोदडे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, अंकुश जाधव, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी, राजेश आगळे, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, सीताराम बहुरे, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी, अजिंक्य येळे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव आणि उमेश ढाकणे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, कासारवाडी याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढवण्याच्याअनुषंगाने या कक्षाची १ मे पासून स्थापना करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कक्ष सुरू राहणार असून या कक्षाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा व येत्या मतदानाच्या वेळी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.