संग्रहित छायाचित्र
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे जुळणी करण्याच्या (पेअरिंग) प्रक्रियेला आज सुरुवात झाली. निगडी प्राधिकरणातील नेताजी सुभाषचंद्र बोस, बॅडमिंटन हॉल मधील स्ट्राँग रुमचे सील पोलीस व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, मतदान यंत्र कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत शिंपी उपस्थित होते.
याप्रसंगी स्ट्रॉंग रूम समन्वय अभिजित केंद्रेकर यांच्या समवेत तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसेच या ठिकाणी असलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊन पुढील कामकाजाचे निर्देश दिले. कमिशनिंग आणि पेअरिंग बाबत करावयाच्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली.
तसेच ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत मतदान यंत्रांच्या जुळणीची (पेअरिंगची) प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कामकाज सुरु आहे. दि. १३ व १४ नोव्हेंबर या दिवशी मतदानासाठी मतदान यंत्रे तयार करणेत येणार आहेत.
दरम्यान, पिंपरी विधानसभेतील मतदान अधिकारी / कर्मचारी यांना १२ नोव्हेंबरला प्रशिक्षण आकुर्डी येथील वसंतदादा पाटील विद्यालय, फकीर भाई पानसरे विद्यालय, मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू विद्यालय या ठिकाणी सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.