संग्रहित छायाचित्र
गुरुग्रंथ साहिब मध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्यक्ष गुरु ग्रंथ साहिबला पवित्र मानतो आणि गुरु ग्रंथ साहिब मधील वचनाप्रमाणे महिलांना आदरभाव देत असतो त्याच भावनेतून समस्त शीख बांधव पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना पाहतो आहे व त्यांच्या पाठीशी संपूर्ण शिक समाज खंबीरपणे उभा राहील असे अभिवचन शिख बांधवांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना दिले.
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आपल्या प्रचार फेरीचा शुभारंभ पिंपरी कॉलनी मधील गुरुद्वारामध्ये जाऊन दिवाण हॉलमध्ये वंदन करून सुरू केला. यावेळी तेथील लंगर मध्ये त्यांनी थोडा वेळ भाविकांना प्रसाद वाटप करून कार सेवा देखील केली.
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी केलेल्या कार सेवेमुळे उपस्थित शीख बांधवांनी समाधान व्यक्त केले यावेळी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी लंगर मधील प्रसादही ग्रहण केला. यावेळी शेकडो शिख बांधव उपस्थित होते. अनेक शिख बांधवांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना शुभेच्छा देत समस्त शीख समाज एकमुखी आपल्या पाठीशी राहील असे अभिवचन दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.