राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? शरद पवार म्हणाले...

येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भविष्यात काँग्रेस पक्षात विलीन होणार का या विषयी होणाऱ्या चर्चेवरही त्यांनी खुलासा केला.

Sharad Pawar

संग्रहित छायाचित्र

येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होतील, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भविष्यात काँग्रेस पक्षात विलीन होणार का या विषयी होणाऱ्या चर्चेवरही त्यांनी खुलासा केला. ते एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील. तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील.

आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असे विचारले असता पवार म्हणाले, याबद्दल आताच काही सांगू शकत नाही. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. घाईने कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना पवार म्हणाले, आमची विचारधारा ही काँग्रेस पक्षाशी जुळती आहे. दोन्ही पक्ष नेहरू-गांधी विचारसरणीवर चालणारे आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे अवघड असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest