मावळमध्ये अखेरच्या क्षणी वंचितकडून महिला कार्ड!

मावळ मतदारसंघात दुहेरी लढत ठाम असताना अनपेक्षितपणे वंचित बहुजन आघाडीकडून महिला उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे ३८ उमेदवारांपैकी ही एकमेव महिला उमेदवार आहे.

Maval Lok Sabha Constituency

मावळमध्ये अखेरच्या क्षणी वंचितकडून महिला कार्ड!

पंकज खोले
मावळ मतदारसंघात दुहेरी लढत ठाम असताना अनपेक्षितपणे वंचित  बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) महिला उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे. विशेष म्हणजे ३८ उमेदवारांपैकी ही एकमेव महिला उमेदवार आहे. त्यामुळे महिला म्हणून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देवून एक वेगळीच युक्ती राबविल्याचे दिसून येते. त्यामुळे मावळामध्ये सद्यस्थितीत दिसत असलेली दुहेरी लढत आता वंचितकडून महिला उमेदवार दिल्याने तिहेरी झाली असल्याची चर्चा रंगत आहे.

मावळामध्ये (Maval Lok Sabha Constituency) आज अखेरपर्यंत ३८ जणांनी ५० अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये अपक्षांची संख्या तब्बल २२ आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला असून, त्यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी प्रथमच अर्ज भरला असून, ही निवडणूक लढवण्यावर त्या ठाम आहेत. पिंपरी चिंचवड परिसरातून वंचितकडून एखादा उमेदवार जाहीर होईल अशी चर्चा सुरू असताना, अचानकपणे माणगाव, रायगड येथून माधवी जोशी (Madhvi Joshi) यांना वंचितकडून मावळातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वरवर दिसणारी मावळातील दुहेरी लढत आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तिहेरी केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest