मी शरद पवारांचा मुलगा असतो तर संधी मिळालीच असती; अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत

मी शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला डावलले गेल्याची खदखद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेत अजित पवार बोलत होते.

संग्रहित छायाचित्र

गेल्या ३२ वर्षांत शरद पवार यांचा शब्द कधीही मोडला नाही. माझे वय देखील ६० च्या पुढे गेले आहे. आम्हालाही संधी मिळायला हवी. आम्ही काही चुकीचं वागतोय का? असं विचारून अजित पवारांनी मतदारांना भावनिक न होण्याचं आवाहन केलं. अजित पवार पुढे म्हणाले, पवार साहेब आमचे दैवत आहेत याबद्दल दुमत नाही. परंतु प्रत्येकाचा काळ असतो. ८० वर्षांच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला नक्कीच संधी मिळाली असती. पण मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही अशी खदखद अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली. 

आम्ही दिवसरात्र काम करून जिल्हा सांभाळला. शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हातात होती. मी १९९१ साली राजकारणात आल्यापासून आजपर्यंत जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताब्यात ठेवली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest