Baramati Lok Sabha: शरद पवारांनी माळेगाव येथे केले मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघात आज (७ मे) मतदान होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.

Sharad Pawar

शरद पवारांनी माळेगाव येथे केले मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघात आज (७ मे) मतदान होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. तसेच खासदार सुप्रिया सुळे तसेच प्रतिभा पवार हे कुटुंबीयही मतदान करताना दिसले. मतदान केंद्रावर आल्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पवारांचे स्वागत केले. 

काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान बारामतीमधून मुंबईला बदलून घेतले होते. परंतु राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर, तसेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील निवडणुकीचा सामना अटीतटीचा असल्या कारणाने त्यांनी बारामतीमधून मतदान करण्याचा निर्णय घेतला. 

शरद पवार मुंबईत मतदान बदलून घेण्याआधी बारामतीमधील रिमांड होम येथे मतदान करत असत. परंतु पक्षात फुट पडल्याने त्यांनी मुंबईवरून आपले मतदान पुन्हा बारामती मध्ये बदलून घेण्याचा निर्णय घेतला. आज मतदान झाल्यानंतर पवार आपल्या गोविंदबाग या निवासस्थानी दिवसभर थांबणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेनंतर आरोग्याच्या कारणाने पवारांनी आपले कार्यक्रम रद्द केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest