Baramati Lok Sabha: मतदान करून सुप्रिया सुळे थेट अजित दादांच्या घरी!

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांवर मतदान होत असून बारामती लोकसभा मतदारसंघात आज (७ मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.

Supriya Sule

संग्रहित छायाचित्र

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांवर मतदान होत असून बारामती लोकसभा मतदारसंघात आज (७ मे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केले. तसेच सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. परंतु मतदान झाल्यानंतर सुप्रिया सुळे ह्या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीची जोरात चर्चा सुरू असून मतदारांकडून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

सुप्रिया सुळे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या थेट अजित पवारांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी पोहोचल्या. आपल्या काकी म्हणजे अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी आपण त्यांच्या घरी गेल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच हे नेहमीचं रुटीन असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच अजित पवार यांची भेट घेण्यासाठी नाही तर काकींनाच भेटण्यासाठी आल्याचंही त्या म्हणाल्या. त्यांना भेटून लगेच निघाल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सुप्रिया सुळेंच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

बारामती लोकसभेची निवडणूक यंदा अटीतटीची होत असून महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार या नणंद- भावजय अशी ही लढत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकमेकांवर जोरदार टिका केली. तसेच वेळोवेळी ही निवडणूक कौटुंबिक नसून वैचारिक असल्याचा दावाही दोन्ही बाजूंनी करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest