मावळ मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी

मावळ मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, आत्तापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ५२ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

cVIGIL App

संग्रहित छायाचित्र

चिंचवडमध्ये सर्वाधिक १८ तक्रारी, १३ तक्रारीवर अद्याप कारवाई नाही

पंकज खोले

मावळ मतदारसंघात (Maval Lok Sabha Constituency) सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, आत्तापर्यंत आचारसंहिताभंगाच्या ६८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. उमेदवारांची अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ५२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. आठ दिवसात सोळा तक्रारींची वाढ झाली आहे. त्यातील १३ तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.चिंचवडमध्ये सर्वाधिक १८ तक्रारी दाखल झाल्या आहेत पनवेल मतदार संघातील सर्वाधिक सहा तक्रारीं प्रलंबित आहेत. १०० मिनीटांच्या आत तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्यांना पोहोचवली जाते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (ॲप) विकसित करत नागरिकांचा निवडणुकीचील सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले ‘सी-व्हिजील’ हे ॲप (cVIGIL App)  यासाठी उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर मोठ्या संख्येने तक्रारी दाखल होत आहेत.

मावळमधील मतदारांना आचारसंहिता भंगाबाबत (Model Code of Conduct) किंवा नियमाच्या उल्लंघनाबाबत तक्रार करण्याचे आवाहन केले होते. आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप उपलब्ध करुन दिले आहे. यावर मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या तक्रारी वेगवेगळ्या भागातून दाखल झाल्या आहेत. थेट उमेदवारावर कारवाई करण्याची मागणीही काही नागरिकांनी केली आहे.

आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हीडीओ, ध्वनीफिती (ऑडिओ) अपलोड कराव्या लागत असल्याने खोट्या, बनावट तक्रारी करता येत नाहीत. १६ एप्रिल पर्यंत ५२ तक्रारी दाखल होत्या. आता त्यांची संख्या ६८ पर्यंत गेली आहेत. अर्ज विक्री व स्वीकृती सुरू झाल्यानंतर तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसात १६ तक्रारींची भर पडली आहे. चिंचवडमध्ये सर्वाधिक १८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सर्वात कमी तक्रारी उरणमधून आल्या आहेत. ६८ पैकी ५५ तक्रारीवर कार्यवाही करून निरसन केले आहे. मात्र अद्याप १३ तक्रारीवर कारवाई झाली नाही. 

हे ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थिर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथक घटनेच्या ठिकाणी १५ मिनीटांत पोहोचते. १०० मिनीटांच्या आत तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्यांना पोहोचवली जाते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest