चोरटे मंदिरातील घंटाही सोडेनात, कोंढवा पोलीसांकडून एकाला अटक

आर्थिक अडचण असल्यामुळे चोरट्याने थेट मंदिरातील घंटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याने रिक्षातून येवून कोंढवा परिसरात असलेल्या भैरवनाथ मंदिरामधील घंटा चोरली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 22 Jun 2023
  • 10:18 am
arrested : चोरटे मंदिरातील घंटाही सोडेनात, कोंढवा पोलीसांकडून एकाला अटक

संग्रहित छायाचित्र

आर्थिक अडचण असल्याने चोरली होती घंटा

आर्थिक अडचण असल्यामुळे चोरट्याने थेट मंदिरातील घंटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याने रिक्षातून येवून कोंढवा परिसरात असलेल्या भैरवनाथ मंदिरामधील घंटा चोरली होती.

सोहेल इलियाज शेख (वय २५, रा. वडारवाडी, गोलंदाज चौक, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील भैरवनाथ मंदिरातील घंटा चोरी गेल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलीसांनी घटनास्थळाच्या आजुबाजुला असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

या सीसीटीव्हीमध्ये एक चोरटा रिक्षामधून घंटा चोरी करुन नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी रिक्षा मालकाचा शोध घेवून चौकशी केली. त्यानंतर सोहेलला रिक्षा चालवण्यासाठी दिल्याचे रिक्षा मालकाने सांगितले. २० जून रोजी रिक्षा चालक सोहेल ल्लानगर भागात भाडे सोडण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशी दरम्यान आपण आर्थिक अडचण असल्याने घंटा चोरी केल्याची कबूली चालकाने दिली. पोलीसांनी रिक्षाच्या मागील बाजुस डिकीत लपवुन ठेवलेली घंटा जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest