पुणे : रिक्षाचालकाचा २९ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

२९ वर्षीय संगणक अभियंता महिलेवर रिक्षाचालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २० जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील काळेपडळ येथील रेल्वेगेटजवळ घडली. या प्रकरणी पोलीसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 21 Jun 2023
  • 05:17 pm
रिक्षाचालकाचा २९ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

संग्रहित छायाचित्र

वानवडी पोलीसांनी रिक्षाचालकाना केली अटक

२९ वर्षीय संगणक अभियंता महिलेवर रिक्षाचालकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना २० जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील काळेपडळ येथील रेल्वेगेटजवळ घडली. या प्रकरणी पोलीसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

अनिकेत नानासाहेब मुंजाळ (वय २४, रा. सध्या रा. शिवचैतन्यनगर, फुरसुंगी, हडपसर, मूळ रा. उंबरे, माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी संगणक अभियंता महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला संगणक अभियंता असून ती एका खासगी कंपनीत कामाला आहे. २० जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास काम आटोपून ती घरी निघाली होती. रिक्षातून जात असताना चालकाने काळेपडळ परिसरात रेल्वे फाटकाजवळ निर्जन ठिकाणी रिक्षा थांबविली. त्यानतंर महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने धक्काबु्क्की केली. प्रसंगावधान राखून महिलेने त्वरित या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीसांनी रिक्षा चालकाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला अटक करून चालकाविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest