पुणे-नाशिक महामार्गावरील वेश्याव्यवसायावर पोलीसांचा छापा, दोन तरुणींची सुटका

हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावरील बागडेवस्ती येथील सहकार लॉजवर सुरू होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 21 Jun 2023
  • 10:20 am
prostitution : पुणे-नाशिक महामार्गावरील वेश्याव्यवसायावर पोलीसांचा छापा, दोन तरुणींची सुटका

पुणे-नाशिक महामार्गावरील वेश्याव्यवसायावर पोलीसांचा छापा, दोन तरुणींची सुटका

एकाला पोलीसांनी केली अटक, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे-नाशिक महामार्गावरील बागडेवस्ती येथील सहकार लॉजवर सुरू होता. ही कारवाई पिंपरी चिंचवडच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभागाने केली आहे.

पोलीसांनी अजित संजीवनलाल गौतम (वय २१, रा. कुरुळी, गाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. तर सुधाकर संजीव शेट्टी (वय ४९, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि सुधाकर सरकार लॉजमध्ये हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते. त्यांनी पैशांची फूस लावून दोन तरुणींना या व्यवसायात ओढले गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून हा धंदा सुरू होता. याबाबत पोलीसांना माहिती मिळताच बनावट ग्राहक पाठवून पोलीसांनी खात्री केली. त्यानंतर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका कऱण्यात आली आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींसह दोघांवर कलम ३७० (३) ३४ आणि अनैतिक मानवी तस्करी कायद्याच्या कलम ३,, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest