दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठे यश, संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलीसांना मोठे यश आले आहे. पोलीसांनी संशयीत आरोपी राहूल हंडोरेला मुंबईतून अटक केली आहे. हत्येनंतर तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 22 Jun 2023
  • 10:44 am
Darshana Pawar murder case : दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठे यश, संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठे यश, संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

राहुल आणि दर्शना दोन वर्ष होते रिलेशनशिपमध्ये

दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलीसांना मोठे यश आले आहे. पोलीसांनी संशयीत आरोपी राहूल हंडोरेला मुंबईतून अटक केली आहे. हत्येनंतर तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिकारी झाल्यावर दर्शनाकडे राहुलने लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, दर्शनाचे दुसरीकडे लग्न जमल्याने राहुलने तिची हत्या केल्याचीही माहिती पोलीसांनी दिली आहे.

दर्शना पवार आणि राहूल हंडोरेचे हे एकमेकांचे नातेवाईक होते. दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनासोबत लग्न करण्याची राहूलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. मात्र या प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधाकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती.

त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, तो देखील परिक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. दोघेही आधी दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, परिक्षेपूर्वी राहूलनेच ब्रेकअप केले होते. ती अधिकारी झाल्यावर पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याच्या रागातून अखेर राहुलनने दर्शनाचा खून केला, अशी माहिती पोलीसांनी दिली.

दर्शना दत्तू पवार, वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी दर्शना पवार एमपीएससी पास झाली. वनसेवेच्या परीक्षेत ती राज्यात तिसरी आली. अत्यंत खडतर संर्घषातून तिने हे यश मिळवलं होतं. यश मिळाल्यावर पुण्यातील एका खासगी क्लासमध्ये सत्कार स्वीकारायला गेली. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी पोलीसांनी मिळाला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर या प्रकरणी संशयीत आरोपी राहूल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात पोलीसांनी यश आले आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest