Pune News : शिवरायांचा इतिहास आयसीएससी आणि सीबीएससीच्या अभ्याक्रमात समाविष्ट करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आयसीएससी ICSC ( इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) व सीबीएससी (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी ) CBSC या दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये व्यापक पद्धतीने समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील पतीत पावन संघटनेकडून करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Archana More
  • Tue, 7 Nov 2023
  • 06:39 pm
Pune News : शिवरायांचा इतिहास आयसीएससी आणि सीबीएससीच्या अभ्याक्रमात समाविष्ट करण्याची मागणी

शिवरायांचा इतिहास आयसीएससी आणि सीबीएससीच्या अभ्याक्रमात समाविष्ट करण्याची मागणी

पतीत पावन संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आयसीएससी ICSC ( इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) व सीबीएससी (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी ) CBSC  या दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये व्यापक पद्धतीने समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील पतीत पावन संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पुण्याचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले आहे.

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, आयसीसी व सीबीएससी या दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची माहिती व इतिहास समाविष्ट करण्यात आलेला नाही. या बोर्डाच्या संलग्न असलेल्या शाळांमधील इतिहासाच्या अधिकृत पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नसल्याने आपल्या देशातील सर्व लहान विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. इतिहासातून प्रेरणा घेऊन राष्ट्र निर्माण करायचे असते. परंतु छत्रपतींचा इतिहास समाविष्ट न केल्याने या महापराक्रमी युगपुरुषाचे त्यांनी केलेल्या कार्याचे ज्ञान आपल्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. याची निश्चितच आम्हा सर्वच खंत आहे.

मराठ्यांचा इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा असून सध्याच्या व भावी भारतीय पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. परंतु खंत अशी आहे की, या बोर्डाच्या अभ्यासक्रमात रोमन, फ्रेंच व युरोपियन इतिहासाचा समावेश करण्यात आलेला आहे. आपला इतिहास आपल्या आपल्या पाल्यांना शिकवायचे नाही. परंतु परक्यांचा इतिहास आपल्या पाल्यांना शिकवायचा ही बाब खरंच संताप जनक आहे, अशी भावना अनेक युवकांची व पालकांची सुद्धा आहे. राष्ट्रनिर्मितीच्या हितार्थ आपला इतिहास सदर बोर्डाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याकरिता संघटना कटिबद्ध आहे. तसेच गरज पडल्यास आम्ही आंदोलनही करण्यास तयार आहोत, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेभाऊ पाटील, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक, पुणे शहर कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर, शैक्षणिक विभाग समन्वयक ध्रुव जगताप, पुणे शहराचे सरचिटणीस विक्रम मराठे, पुणे शहराचे संपर्कप्रमुख गुरु कोळी, पुणे शहराचे संघटक मिलिंद तीकोणे, पुणे शहराची चिटणीस संजय तिकोने, अजय कवठे, कार्यालयीन प्रमुख अशोक परदेशी, कसबा प्रमुख योगेश वाडेकर, कॅन्टोन्मेंट प्रमुख नर्सिंग कोळी, कसबा विभाग संपर्कप्रमुख स्वप्निल आंग्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest