‘इंद्रायणी फेसाळण्यास सांडपाणीच कारणीभूत’

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच जबाबदार असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या नगरपालिका सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत असल्याने नदीचे प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

pimpri chinchwad news

‘इंद्रायणी फेसाळण्यास सांडपाणीच कारणीभूत’

स्थानिक स्वराज संस्थांमुळेच सांडपाणी नदीत मिसळते; राज्य प्रदूषण मंडळाचा ठपका

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच जबाबदार असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या नगरपालिका सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत असल्याने नदीचे प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हरित न्यायाधिकरणाने या प्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए),  पुणे जिल्हाधिकारी यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. इंद्रायणी नदी सध्या फेसाळलेली दिसत असून घरगुती आणि औद्योगिक कचरा नदीच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसत आहे. हरित न्यायाधिकरणाने याची स्वत:हून दखल घेतली आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल एनजीटीकडे सादर केला. त्यामध्ये म्हटले आहे की, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास प्रामुख्याने प्रक्रिया न केलेले सांडपाणी आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगर पंचायत, तळेगाव दाभाडे नगर परिषद,  देहूरोड कॅन्टोन्मेंट, देहू नगर पंचायत आणि आळंदी नगर परिषद. या सात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एकूण पाण्याचा वापर २४९.४२ एमएलडी आहे. येथून १६८.२ एमएलडी घरगुती सांडपाणी तयार होते. मात्र, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची सांडपाणी शुध्दीकरण क्षमता ( एसटीपी) ९६.५ आहे. त्यामुळे  ६७.३  एमएलडी सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. अहवालानुसार नदीच्या उगमापासून आळंदी नगरपालिकेपर्यंत विविध ठिकाणी नदीच्या पाण्यात डिटर्जंट पॅरामीटरचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

एनजीटी (पश्चिम खंडपीठ) कोरमचे  न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची कारणे तपशिलात दिली आहेत.  त्यावर उपाय म्हणून अंमलबजावणी करावयाच्या सूचनाही एमपीसीबीने दिल्या आहेत. त्यामुळे या सूचनांचा विचार करायला हवा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story