पिंपरी आगारात आजपासून 'प्रवासी राजा दिन'

प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक एसटी आगारात (डेपो) येत्या १५ जुलैपासून दर सोमवारी व शुक्रवारी 'प्रवासी राजा दिन' आयोजित करण्यात येणार आहे.

Prawasi Raja Din, Pimpri Chinchwad, Pimpri Agar

संग्रहित छायाचित्र

प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक एसटी आगारात (डेपो) येत्या १५ जुलैपासून दर सोमवारी व शुक्रवारी 'प्रवासी राजा दिन' आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे, प्रवाशांचे समाधान होण्याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवास आणि त्यांच्या समस्येचे निराकरण होणार आहे.

प्रवासी राजा दिनाच्या दिवशी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांना आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडता येणार आहेत. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करणार आहेत. हा दिन कोणत्या दिवशी, कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या, त्या वेळी जाहीर करणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे ?, यावर मध्यवर्ती कार्यालयाकडून लक्ष ठेवले जाणार आहे.

एसटीच्या वल्लभनगर आगारामधून विविध बसमधून दररोज सुमारे ६ हजार प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. त्यासाठी ५० हुन अधिक बस वेगवेगळ्या मार्गावर धावतात. एसटीकडून सेवा वेळेत आणि खात्रीशीर मिळावी, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासह इतर तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. गर्दीच्यावेळी जादा बसचे नियोजन केले जावे, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, एसटी बसस्थानके, प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक हवीत, उपहारगृह स्वच्छ असावे. ताजे खाद्यपदार्थ मिळावेत, ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना समजेल, अशा आवाजात माहिती दिली जावी, अशा काही प्रवाशांच्या मागण्या आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story