पिंपरी-चिंचवड : साडेतीन लाख शिधापत्रिका अन् अवघे ११ कर्मचारी

शिधापत्रिकांच्या कामांना गती नाही, धान्यवाटपाच्या तक्रारींकडे निरीक्षकांचे दुर्लक्ष, दुकानदारांची तपासणीस चालढकल आणि नागरिकांची रखडलेली कामे अशी अवस्था सध्या शिधापत्रिका कार्यालयाची झाली आहे.

PCMC News

संग्रहित छायाचित्र

कार्यालयातील कामांना मिळेना गती, अर्जदारांना मारावे लागतात हेलपाटे

शिधापत्रिकांच्या कामांना गती नाही, धान्यवाटपाच्या तक्रारींकडे निरीक्षकांचे दुर्लक्ष, दुकानदारांची तपासणीस चालढकल आणि नागरिकांची रखडलेली कामे अशी अवस्था सध्या शिधापत्रिका कार्यालयाची झाली आहे. लाभार्थ्यांच्या तुलनेने अपुरे मनुष्यबळ आणि साडेतीन लाख शिधापत्रिका यांचा मेळ बसत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत. सध्याच्‍या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडत असून, सात पदे रिक्त आहेत.

पिंपरी-चिंचवड, निगडी, पिंपरी आणि भोसरी असे तीन कार्यालय मिळून साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. पण, त्यासाठी काम करायला कार्यालयात केवळ ११ कर्मचारी आहेत. तीन कार्यालयांतर्गत मंजूर पदांपैकी सात पदे रिक्‍त आहेत. कर्मचारी कमी असल्‍याने शिधापत्रिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. कामे रखडत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. रिक्त पदे भरण्याची कार्यालयांना प्रतीक्षा आहे.  

नवीन शिधापत्रिका काढणे, दुबार शिधापत्रिका, नाव वाढवणे अशा विविध कामांसाठी कार्यालयात नागरिक गर्दी करत आहेत. निगडी, चिंचवड आणि भोसरी या तीनही कार्यालयांतर्गत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचा समावेश होतो. या संख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अपुरी आहे. निगडी आणि चिंचवड येथील शिधापत्रिका कार्यालयासाठी १२ पदे मंजूर आहेत. या पैकी दोन्ही कार्यालयात सहा पदे भरलेली आहेत. यामध्ये दोन पुरवठा निरीक्षक, एक लिपिक आणि तीन शिपाई आदींचा समावेश आहे. दोन्ही कार्यालयांना परिमंडळ अधिकारी नियुक्त केलेला नाही. त्यामुळे पुरवठा निरीक्षकांवरच परिमंडळ अधिकाऱ्यांचे काम करण्याची वेळ येत आहे. भोसरी येथील कार्यालयात एकूण पाच पदे मंजूर आहेत. या पैकी चार पदे भरलेली असून लिपिकाचे एक पद रिक्त आहे. शिधापत्रिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिधापत्रिका कामाव्यतिरिक्त इतरही कामे करावी लागत आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामासाठी देखील नियुक्त केले जाते. कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने शिधात्रिका कार्यालयातील सर्व कामे ठप्प होत आहेत.

पदांची आकडेवारी

कार्यालय मंजूर पदे रिक्त पदे शिधापत्रिकाधारक

निगडी एक लाख १० हजार २५

चिंचवड एक लाख २२ हजार ६७९

 

भोसरी एक लाख पाच हजार ३३६

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story