पिंपरी-चिंचवड: लाडकी लालपरी आता सीएनजीवर चालणार

शिरुर आणि राजगुरुनगर या दोन आगारातील एकूण ६१ लालपरी सीएनजीवर धावताहेत. बारामती, सासवड आणि मंचर या चार आगारांत पहिल्या टप्प्यात महामंडळाकडून स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्यात येत आहे. या सर्व आगारात मिळून एकूण १३२ लालपरी सीएनजीवर धावतील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Pankaj Khole
  • Edited By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 01:13 pm
pimpri chinchwad, st bus, CNG, separate CNG pumps,  Corporation, bus depos

लाडकी लालपरी आता सीएनजीवर चालणार

जिल्ह्यात ६१ लालपरी धावताहेत सीएनजीवर, डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी उचलले पाऊल, अन्य आगारातही सीएनजीला मिळणार प्राधान्य

डिझेलचा तुटवडा आणि आगारातील इंधन खर्च कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील ६१ लालपरी बसचे सीएनजीत रुपांतरण करण्यात आले आहे. यामुळे लाखो रुपयांची बचत होणार असून, प्रदूषणावरही आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शिरुर आणि राजगुरुनगर या दोन आगारातील एकूण ६१ लालपरी सीएनजीवर धावताहेत. बारामती, सासवड आणि मंचर या चार आगारांत पहिल्या टप्प्यात महामंडळाकडून स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्यात येत आहे. या सर्व आगारात मिळून एकूण १३२ लालपरी सीएनजीवर धावतील.

डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सध्या सर्वत्र पर्यायी इंधनाचा विचार केला जात आहे. महामंडळाचा सगळ्यात खर्च डिझेलवर होतो. त्यामुळे आर्थिक तूट निर्माण होते. त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याने टप्प्याटप्याने डिझेलवर धावणाऱ्या लालपरी सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होत असून, येत्या वर्षभरात पुणे विभागातील सर्व एसटी या सीएनजीवर रुपांतरित करण्यात येणार आहेत. पुणे विभागात एकूण १४ आगार असून, दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांसह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी खर्‍या अर्थाने जीवनवाहिनी मानली जाते. पुण्यातून राज्याच्या कानाकोपर्‍यात प्रवासी ये-जा करत असतात.  एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या, जीर्ण नाददुरुस्त  झालेल्या अवस्थेत आहेत.  त्यामुळे महामंडळाने नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर भर दिला आहे. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील बस सीएनजीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

विभागात ८०० बस
पुणे एसटी विभागात सध्या जवळपास ८०० बसेस आहेत. त्यापैकी ७०० ते ७५० बस या मार्गावर धावतात. उपलब्ध असलेल्या बसेसमध्ये  ५०० बस जुन्या झाल्या असून, त्या सर्व बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात शिरुर आगारातील ४७ आणि राजगुरुनगर आगारातील १४ बसेसचे सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात आलया आहेत.

चार आगारात स्वतंत्र पंप
पुणे विभागातील सर्व बसेस सीएनजीत रुपांतरित करण्यात येत असल्याने सीएनजीचा पुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांत महामंडळाकडून स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, सासवड आणि शिरुर आगारात खासगी गाड्यांना सीएनजी विक्री करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे सीएनजी विक्रीतून महामंडळाला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

पुणे विभागातील महामंडळाच्या बस

 एकूण उपलब्ध बस ८१५

 बंद बस ६८

 मार्गावरील बस ७४७

 खासगी तत्वावरील बस ६७

 सीएनजीवरील बस ६१

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest