पिंपरी-चिंचवड: बोगस एजंट विरोधात आरटीओ ॲक्शन मोडवर; 'सीविक मिरर' च्या वृत्तानंतर एकावर केली कारवाई

पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून बोगस  एजंट, कोणतीही परवानगी, आवश्यक कागदपत्रे नसलेले मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालक यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

Pimpri-Chinchwad, RTO, bogus agents

संग्रहित छायाचित्र

आरटीओ परिसरात इतरत्र फिरणाऱ्या एजंटांचे धाबे दणाणले

पिंपरी-चिंचवड: शहरातील नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आरटीओ प्रशासनाकडून बोगस  एजंट, कोणतीही परवानगी, आवश्यक कागदपत्रे नसलेले मोटर ड्रायव्हिंग स्कूल चालक यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शहरातील एका बोगस एजंटवर नुकतीच कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक करून आरटीओची कामे करण्यासाठी हेलपाटे मारणाऱ्या बोगस एजंटांवर अंकुश बसणार आहे.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढवून तो प्रादेशिक परिवहन करण्यात आलेला आहे. त्यामुळे कार्यालयाचा ताण आणखी वाढला आहे. परिणामी, शहरातील नागरिकांना रस्त्यावरती अथवा इतरत्र गाठून आरटीओची कामे करून देतो, अशी बतावणी करून फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अशा एजंटांकडून नागरिकांचे काम अर्धवट केले जाते. अनेकांना त्यासंबंधित सखोल माहिती नसल्याने काम न करता एजंट निघून जातात. त्यामुळे त्यांना पैसे भरूनही मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी त्यांना पुन्हा आरटीओचे हेलपाटे मारावे लागतात. याबाबत काही तक्रारीही कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या.

दरम्यान,  'बोगस एजंटांवर कारवाई होणार' असे वृत्त 'सीविक मिरर'च्या माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर लगेच आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत एकावर कारवाई केली आहे. या प्रकारे आणखी आढावा घेणारा असून, नागरिकांची तक्रार अथवा पाहणीमध्ये अशाप्रकारे बोगस व्यक्ती अथवा एजंट आढळून आल्यास त्यावरती कारवाई करण्याचा इशारा आरटीओने दिला आहे. प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती नसताना देखील अनेक जण परस्पर आरटीओकडून कामे करून घेतात. यापुढे असे चालणार नाही. प्रत्येक कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. न्यू पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेऊन अशाप्रकारे बोगस एजंटांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे खुद्द आरटीओ अधिकाऱ्यांना देखील असे प्रकार पाहणीतून निदर्शनास आले होते. त्यानुसार आरटीओमध्ये फिरणाऱ्या एका एजंटावर कारवाई केली असून,  त्याने दाखल केलेली कागदपत्र ताब्यात घेतली आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story