प्रवाशांची रात्रीची गैरसोय टळणार
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराला जोडणाऱ्या पीएमपीएमएलने रात्रीच्या वेळेस येणाऱ्या ट्रेन, एसटी बस आणि ट्रॅव्हल्स यांच्या वेळा लक्षात घेऊन 'रातराणी बस'चे वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पहिल्या टप्यात पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले आहे, तर या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोयदेखील टळणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे देशभरातील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. पिंपरी आणि चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस रेल्वे थांबत नसल्यामुळे नागरिकांना पुणे स्थानकावर उतरावे लागते, तर एसटी बसेस वल्लभनगरला न थांबता थेट शिवाजीनगर आगारात थांबत आहेत. उद्योगनगरीतील निगडीतून रात्री सव्वा अकराची शेवटची बस जाते. मात्र त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची बसअभावी गैरसोय होत आहे. तशीच परिस्थिती रात्री अकरानंतर पुण्यातून पिंपरी-चिंचवडकडे येणाऱ्या प्रवाशांची निर्माण होत आहे. रात्री एसटी किंवा रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना पिंपरी-चिंचवडकडे येण्यासाठी रिक्षा, कॅबचा आधार घ्यावा लागतो. या वेळी रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. रिक्षाचालकांचे रात्रीचे दर जास्त असल्याने खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यामुळे पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही रातराणी बस सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
एमआयडीसी हद्दीत मार्ग वाढवावेत
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी ओळखले जाते. त्यामुळे या शहरात मोठा कामगार वर्ग राहतो. रात्रीच्या वेळी कामावर परतत असताना या कामगारांना पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसते. त्यामुळे या कामगारांना दुचाकी विकत घ्यावे लागतील. तर काहींना पायी प्रवास करावा लागतो. यामुळे प्रमुख एमआयडीसी मार्गावर रात्रीची बससेवा सुरू करावी, अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे. त्याचप्रमाणे आयटी पार्कसाठीही सेवा उपयुक्त ठरणार आहे.