रावेतमध्ये 'कमळ' सुसाट; आमदार अश्विनी जगताप यांचा बैठकांचा धडाका
रावेत परिसर सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसराचा विकास करण्याकरिता 'व्हिजन' असणारे नेतृत्व गरजेचे आहे. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांचा विकासाचा वारसा घेऊन शंकर जगताप मैदानात उतरले आहेत. म्हणूनच रावेतच्या सर्वांगीण विकासाकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन; आमदार अश्विनी जगताप यांनी रावेतमधील मतदारांना केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी रावेत परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी सिल्वर ग्रेसीया, एक्वा मिलेनियम, कोहिनूर ग्रंडीयुवर, सेलेस्टीयल सिटी, सद्गुरु चौक, आदित्य विवाझ, संकेश्वर हाउसिंग सोसायटी यासह अनेक सोसायटींना भेट देऊन मतदारांची संवाद साधला. या भेटीदरम्यान सदनिकाधारकांनी आमदार अश्विनी जगताप यांच्याशी दिलखुलासपणे चर्चा केली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका संगीता भोंडवे, दीपक भोंडवे, काळेवाडी - रावेत मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, युवा मोर्चाचे ओंकार भोंडवे, अजय भोंडवे, प्रवीण सिंह, शिवसेनेच्या शैला पाचपुते, शिला भोंडवे, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, वंदना कांबळे, अनु निवाने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सदनिकाधारकांशी संवाद साधताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा विकासाचा वारसा पुढे चालवण्याकरिता शंकर जगताप कटिबद्ध आहेत. चिंचवड मतदार संघातील रावेत हा परिसर कात टाकत आहे. या भागात मोठ मोठे गृहप्रकल्प नव्याने निर्माण होत आहेत. त्यामुळे योग्य पद्धतीने या भागाचा विकास आराखडा करणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध काम केल्यानंतरच या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. रावेतचा परिसर हा आपल्याला 'स्मार्ट' करायचा आहे. त्याकरिता रावेतवासियांची साथ महत्त्वाची आहे. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. रावेत परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन आमदार जगताप यांनी मतदारांना केले.
रावेत येथे जनतेचा मनापासून पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्रचंड बहुमताने शंकरभाऊंना विजयी करत आपण एकत्रित 'विजयी गुलाल' उधळणार आहोत. आणि हे सर्व तुम्हा जनतेच्या पाठिंब्यानेच शक्य होणार आहे. आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या, असे आवाहन अश्विनी जगताप यांनी मतदारांना केले.