पिंपरी-चिंचवड : वाहकांच्या बस दामटण्याच्या तक्रारी

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससेवेचा लाभ हजारो प्रवासी घेतात. त्यातच सेवेसाठी संयुक्त बीआरटी मार्ग करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात चार ठिकाणी हा मार्ग उपलब्ध आहे.

PMPML bus

पिंपरी-चिंचवड : वाहकांच्या बस दामटण्याच्या तक्रारी

प्रत्येक थांब्यावर बस थांबवण्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने दिले आदेश, प्रवाशांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससेवेचा लाभ हजारो प्रवासी घेतात. त्यातच सेवेसाठी संयुक्त बीआरटी मार्ग करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात चार ठिकाणी हा मार्ग उपलब्ध आहे. पावसाळ्यामध्ये पीएमपी प्रवासाचा प्रवासी वर्ग आणखी वाढला आहे. मात्र, प्रवाशांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. थांब्यावरीला गर्दीला पाहून चालक बस पुढे नेतात. तर, वाहनचालक रिकामी बस पळवतात. नागरिकांनी हात दाखवून बस थांबवण्याची विनंती केल्यावरही बस थांबवत नाहीत, अशा असंख्य तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. आताचे प्रमाण दिवसाकाठी १० ते १२ असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पीएमपीचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असल्याने नागरिक पीएमपी प्रवासाला प्राधान्य देत असतात. पीएमपी बसला मोठी गर्दी होते. तसेच तिकीटाचे दर देखील पाच ते दहा रुपयांपासून सुरु आहेत. संपुर्ण दिवसभर चालणाऱ्या ५० रुपयांचा पासच्या लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. अलीकडेच मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात बसचे प्रवासीदेखील वाढले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या काळात नागरिक दुचाकींऐवजी पीएमपी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र, एकीकडे पीएमपी प्रशासनाचा गल्ला वाढत असताना, प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी कोणतीही पावले उचलली गेल्याचे दिसून येत नाही. कारण, प्रवाशांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.  

शहरातील काळभोरनगर, मोरवाडी, वल्लभनगर, जयश्री टॉकीज, या थांब्यावर बस अशा तक्रारी नागरिक करत आहेत. अनेक वेळा हा प्रकार घडला आहे. बीआरटीच्या प्रत्येक थांब्यावर दोन दरवाजे आहेत. थांब्यावरील बस  कोणत्या मार्गाने जाणार आहे. हे थांब्यावर दर्शवली आहे. परंतु काही बेशिस्त वाहनचालक आपल्या पद्धतीने कधी थांब्याच्या फार पुढे तर कधी थांब्याच्या फार आधी बस थांबवतात. अशा वेळी प्रवासी बसच्या मागे धावा- धाव करतात. काही बसचालक बस रिकामी असूनही तशीच दामटतात. तसेच थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करून जातात.  'ना कोणाचा धाक ना कोणाची भिती' असा प्रकार पीएमपी वाहनचालकांमध्ये पहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  

इथे करा तक्रार

प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रत्येक वाहकचालकांना बसचे नियम व वेगाचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीसुद्धा वाहनचालकाने नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने बस पळवली किंवा बस थांबवली नाही तर प्रवाशांनी तक्रारीसाठी पुढे यावे. पीएमपीच्या संकेतस्थळावर अथवा ः२०२०-२४५४५४५४ येथे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

थांब्यांवर बस व्यवस्थित थांबवण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. एखाद्या वाहनचालकाची तक्रार आल्यानंतर  आमच्याकडून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. प्रत्येक थांब्यावर बस थांबवली पाहिजे. तरी पुन्हा एकदा चालकांना सूचना करण्यात येणार आहेत.

- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest