Rajas of the Road : 'रस्त्याच्या राजां'ची अभिमानास्पद कामगिरी
मोहिमेसाठीचे टी-शर्ट, शिट्ट्या वाजवणे आणि वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी नोंदवलेली आपली वेळ येण्याची वाटही न पहाता या तिघांनी वाहतूक पोलिसांना मदत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) वेगवेगळ्या विभागात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी 'सीविक मिरर', 'पुणे टाइम्स मिरर' आणि पुणे शहर वाहतूक विभागाच्या 'जरा देख के चलो' मोहिमेत सहभागी होत मंगळवारी सायंकाळी अतिशय वर्दळीच्या विद्यापीठ चौकात वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम केले.