Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तगडा बंदोबस्त, पक्ष कार्यालये देखील निगराणीखाली

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलने होत असल्यामुळे पुणे (Pune News) आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात देखील (Politicsw News) सतर्कता बाळगण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Tue, 31 Oct 2023
  • 12:17 pm
Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तगडा बंदोबस्त, पक्ष कार्यालये देखील निगराणीखाली

पुणे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तगडा बंदोबस्त, पक्ष कार्यालये देखील निगराणीखाली

पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलने होत असल्यामुळे पुणे (Pune News) आणि पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात देखील (Politicsw News) सतर्कता बाळगण्यात येत आहे. या तीनही परिक्षेत्रात असलेल्या आमदार, खासदार यांच्या निवसस्थानांवर तसेच राजकीय पक्षांचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांच्या कार्यालय आणि घरांजवल जवळपास २०० ते २५० ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोलिसांची बारीक नजर असून आक्षेपार्ह मजकूर पाठविल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.

दोन्ही शहारांसह जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांची यादी पोलिसानी केली आहे.  मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटी येथील उपोषण अद्याप सुरू असून त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यातच बीडमध्ये सोमवारी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी माजलगावाचे आमदार प्रकाश सोळुंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी आग लावली. तसेच, पक्ष कार्यालये पेटवून दिली. बीडसह सोलापूरयवतमाळ परिसरात लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर देखील निदर्शनं करण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest