Pune Lok Sabha: मोहोळ यांच्या संकल्पपत्रात वाहतूक, पयार्वरणास प्राधान्य

भविष्यातील विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले.

Murlidhar Mohol

मोहोळ यांच्या संकल्पपत्रात वाहतूक, पयार्वरणास प्राधान्य

रस्ते, रेल्वे, मेट्रो मार्ग विकास, समान पाणीपुरवठा, टेकड्या, वनक्षेत्र संरक्षणाचे आश्वासन

भविष्यातील विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ (Murlidhar Mohol)  यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले.

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबु वागस्कर,आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे, लहुजी  क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर उपस्थित होते.

सार्वजनिक वाहतूक वेगवान

मोहोळ यांच्या संकल्प पत्रात नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच  दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा आणि नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, हडपसर स्टेशनचा आधुनिक पद्धतीने विकास करणार. लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे (एनएचएआय) पुणे-नगर रस्त्यावर येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा करण्याचेही आश्वासन आहे.  (Pune Lok Sabha Election 2024)

"पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे. पायाभुत विकास, पर्यावरण, वाहतुक, नवीन रस्ते, अशा योजनांसाठी प्रयत्न करणार पीएमपीच्या ताफ्यात इलेट्रीक बसची संख्या वाढविण्यात येईल. मेट्रोच्या विस्ताराचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यालय चोवीस तास खुले असणार आहे."

- मुरलीधर मोहोळ, महायुतीचे उमेदवार

"पुणे शहराचे प्रश्‍न मोदी सरकारने सोडवले आहेत. मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, चांदणी चौकाचे प्रश्‍न सोडवण्यात आले आहेत. पुण्यासाठी केंद्र सरकारने इलेट्रीकल बस दिल्या, जायका प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले आहे. पुण्याच्या विकासाचे  नियोजन उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे."

- चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

पुण्यासाठी संकल्प... 

 समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार. 

 जुने तलाव, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन 

 नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हाती घेणार

 पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे संरक्षण

 वेस्ट टू वेल्थ’च्या माध्यमातून कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती, खत उत्पादन अशी पर्यावरणपूरक कामे

 मराठीस अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न

 कचरामुक्तीसाठी विविध भागांत प्लॉगेथॉन, ई-कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर प्रकल्प 

 सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, व्यावसायिक संकुलात सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन

 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’(एम्स) पूर्ततेसाठी पाठपुरावा .

 अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणार.

 डॉक्टरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष

 ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’त झोपडपट्टीधारकांना सदनिका 

 रिक्षा सेवेसाठी शासकीय पातळीवर ॲप 

 ‘सीएसआर’ निधीतून स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम 

 श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठासाठी प्रयत्न

 विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.

 आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे समाधीस्थळाच्या कामाला गती

 भिडे वाड्याच्या स्मारकासाठी पाठपुरावा करणार.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest